युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे तरंगफळ येथे सुश्राव्य कीर्तन होणार..

वीरांजली हिच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त देशमुख परिवार यांच्या वतीने कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…
माळशिरस तालुका भाजपचे माजी सरचिटणीस व विद्यमान नातेपुते मंडळ अध्यक्ष संजय देशमुख यांचे कन्यारत्न हरपले होते…
तरंगफळ (बारामती झटका)
ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची संस्थापक अध्यक्ष तथा युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ यांचे गुरुवार दि. 27/08/2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये स्वर्गीय कुमारी वीरांजली संजय देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त सुश्राव्य कीर्तन होऊन पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे..

भारतीय जनता पार्टीचे माजी सरचिटणीस व विद्यमान नातेपुते मंडळ अध्यक्ष संजय देशमुख यांचे कन्यारत्न दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी हरपले होते. वीरांजली लक्ष्मीच्या सोन पावलांनी देशमुख परिवार यांच्या घरामध्ये आलेली होती. अल्पवय मिळाले असले तरी वीरा अनेक आठवणी देशमुख परिवार यांना ठेवून गेलेली आहे.
वीराच्या दुःखद निदाने देशमुख परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. बघता बघता एक वर्ष होऊन गेले. एक दिवस ही असा नसेल वीराची आठवण देशमुख परिवार यांना आलेली नाही. शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही.

वीराच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे, देशमुख परिवार यांच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येत आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



