झी टॉकीज फेम ह. भ. प. कु. आरती ताई भुजबळ, नातेपुते यांचे जळभावी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

वै. बाळासाहेब राऊत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
जळभावी (बारामती झटका)
वैकुंठवासी बाळासाहेब सिताराम राऊत (भाऊ) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. २७/८/२०२६ रोजी जळभावी, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. कु. आरतीताई भुजबळ, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त राऊत परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



