ताज्या बातम्यासामाजिक

“समदु:खी एकत्र” – विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे आणि माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची फलटणमध्ये विचारमंथन बैठक; फोटो व्हायरल

माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केल्यानंतर दोन्ही प्रस्थापित घराण्यांची काय अवस्था ? फलटण पंचक्रोशीत चर्चेला उधाण

फलटण (बारामती झटका

विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी विचारमंथन बैठक संपन्न झाली. यावेळी इतर मान्यवरही उपस्थित होते. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच “समदु:खी एकत्र” आल्याची खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडसाद
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत विरोध केल्याने दोन्ही घराण्यांची सध्याची काय अवस्था झाली, याची चर्चा फलटण पंचक्रोशीत सुरू आहे.

महायुतीमध्ये असा संदेश गेला आहे की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवामागे रामराजे परिवार व मोहिते पाटील परिवाराने जाणीवपूर्वक विरोधी षडयंत्र रचले होते.

रामराजे गटाचे राजकीय अस्तित्व धोक्यात?
चर्चेनुसार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे 30 वर्षांचे राजकीय अस्तित्व संपवले आहे. फलटण विधानसभा, नगराध्यक्षपद, पंचायत समिती सभापती अशी रामराजे यांची सत्ता केंद्रे उध्वस्त करून नवी सत्ता स्थापन केली आहे. सातारा जिल्हा परिषदेतही जिल्हाध्यक्ष व सभापती निवडीत रामराजे गटाला शह दिला आहे. श्रीराम साखर कारखाना सुद्धा लवकरच मोकळा श्वास घेईल, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.

मोहिते पाटील गटाची स्थिती
तशीच परिस्थिती मोहिते पाटील परिवाराचीही झाली आहे. जिल्हा परिषदेत एकहाती असणारी मोहिते पाटील गटाची सत्ता उध्वस्त करण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांच्या अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत असून श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची 300 कोटींची फाईल रखडल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही घराण्यांचे राजकीय गणित बिघडले असून एकेकाळची प्रस्थापित असलेली दोन्ही घराणी आता विस्थापित झाल्याची भावना व्यक्त होत आहे. फलटण पंचक्रोशीत “उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीने कुडकुडत राहिलं” अशी म्हणी वापरून या बैठकीवर खोचक चर्चा रंगली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button