पुणे पदवीधर मतदार संघाच्या भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा “संकल्पनामा” वादा महायुतीचा फायदा पदवीधरांचा…

शारदीय नवरात्र उत्सवात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने नव संकल्पाचा संकल्प मतदारांसमोर ठेवला आहे…
माळशिरस (बारामती झटका )
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026 भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असून प्रचार सुरू झालेला आहे. निवडणूक प्रचारांमध्ये वादा महायुतीचा फायदा पदवीधरांचा असा संकल्पनामा जाहीर करून शारदीय नवरात्र उत्सवात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने नव संकल्पाचा संकल्प मतदारांसमोर ठेवलेला आहे..
“हम वादे नही इरादे लेकर आये है”, असा विश्वास देत 2014 मध्ये देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. देशातील तरुणाईने ज्या अपेक्षांनी भारतीय जनता पार्टी व एनडीएच्या हाती सत्ता सोपवली, त्याला जागत बारा वर्षाहून अधिक काळ सरकार काम करत आहे. संकल्प ते सिद्धी याचा अनुभव आता देशातील जनता घेऊ लागली आहे. ही भावना लक्षात घेऊनच पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारांसमोर मी माझा संकल्पनामा ठेवीत आहे..
संकल्पनामा मांडताना वास्तवाचे भान, मतदारांच्या अपेक्षांची जाण आणि समस्यांवर दूरगामी परिणाम घडवण्याची दृष्टी असणे महत्त्वाचे असते, ही माझी भावना आहे. मी गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे प्रतिवर्षी हजार तरुण-तरुणी समवेत संवाद होतो. जगभरात तरुणांसाठी नवे कोणते ट्रेंड्स येत आहेत, हे समोर येते. या संवादातून अनेक मुद्दे माझ्या लक्षात येत गेले आहेत.
पदवीधर मतदार हा सजग आणि जागतिक स्थितीचे भान असलेला असतो. त्यामुळे त्यांच्याशी विश्वासाच्या नात्यानेच संवाद साधायला हवा, हे माझे सूत्र आहे. होऊ घातलेल्या पदवीधर पदवी घेऊन काहीच काळ लोटलेले पदवी घेऊन करिअरमध्ये बसताना बसवलेले आणि पदवी आणि अनुभवाचा संगम असलेले असे अनेक गट माझ्या डोळ्यासमोर येतात. यातच पदवीधर महिला ही एक स्वतंत्र वर्गवारी आहे. त्यांच्यात काही जणी नोकरी व्यवसाय करतात तर काहीजणी गृहिणी पदाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतात. या सर्वांचा विचार करून संकल्पनामा आम्ही निश्चित केलेला आहे. पदवीधर वर्ग ही देशाची मनुष्यबळ संपत्ती आहे. 2047 पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करायचे असेल तर या पदवीधरांचे योगदान सर्वात मोठे असणार आहे. त्यांना या वाटचालीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हा संकल्पनामा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरी, निमशहरी, ग्रामीण या प्रत्येक भोगोलिक क्षेत्रात हातात हात घालून काम करावे, याचाही विचार झालेला आहे..
नव संकल्प
कौशल्याधारित रोजगार प्रशिक्षण
एआय, डेटा, अनॅलिटिक्स सायबर, सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन पदवीधरांना रोजगार क्षम बनविणार..
मानधनासह इंटर्नशिपच्या संधी
महाविद्यालये, आणि उद्योगांच्या समन्वयातून शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणार..
तालुकास्तरावर करिअर मार्गदर्शन
ग्रामीण पदवीधरांसाठी कौशल्य प्रशिक्षण रोजगार मिळावे आणि परदेशी शिक्षण व रोजगारांसाठी विशेष मार्गदर्शन कक्ष..
स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम तयारी
सुसज्ज अभ्यासिका, डिजिटल लायब्ररी आणि दर्जेदार मार्गदर्शनासह पर्यायी करिअर साठी समुपदेशन.
58 विधानसभा मतदारसंघात उद्योजकतेला चालना
महात्मा फुले इनक्यूबेशन सेंटरच्या स्थापनेसाठी पाठपुरावा, स्टार्टअप्स आणि शासकीय योजनांसाठी मार्गदर्शन.
आपल्याच भागात रोजगाराच्या संधी
पश्चिम महाराष्ट्रात ग्लोबल केपेबिलिटी सेंटरचा विस्तार आणि वर्क फ्रॉम होमटाऊन धोरणासाठी प्रयत्न..
महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमता
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वसतीगृहे पदवीधर व गृहिणीसाठी आर्थिक साक्षरतेचे मोफत मार्गदर्शन.
कृषी उद्योग प्रक्रिया उद्योग
कृषी पूरक कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार, ग्रामीण भागातील पदवीधर तरुणांना त्यांच्या मार्फत रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार..
नियमित जनसंपर्क आणि कामाचा आढावा
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष संपर्क अभियान, स्वतंत्र पोर्टल आणि दर तीन महिन्यांनी कामाची माहिती देणारे नियतकालिक..
१) तरुणाईस रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष मोहीम
पदवीधरांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता भासते. एआय, डेटा अॅनॅलिटिक्स, सायबर सुरक्षा, ईव्ही तंत्रज्ञान, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, इंडस्ट्री ४.०, ड्रोन तंत्रज्ञान यांसह नवनव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देत उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेणार.
२) इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप
पदवीधरांना शिक्षण पूर्ण करीत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी कंपन्या आणि महाविद्यालये यांच्यात समन्वय वाढविणार. मानधनासह इंटर्नशिप आणि अॅप्रेंटिसच्या संधी निर्माण करणार.
३) ग्रामीण पदवीधरांसाठी विशेष संधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी तालुकास्तरावर करिअर मार्गदर्शन, डिजिटल अभ्यासिका, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे आयोजित करणार.
४) परदेशी शिक्षण व रोजगार मार्गदर्शन
बहुसंख्य यूरोपीय देशांत मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर उणीव भासते आहे. तेथील रोजगाराच्या संधीची सातत्याने माहिती देणे, शिक्षणासाठी शिष्यवृत्त्यांची माहिती देणे, त्यासाठी आवश्यक समुपदेशन करणे, या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची निर्मिती करणार.
५) स्पर्धा परीक्षांसाठीची सज्जता
यूपीएससी, एमपीएससी, बैंकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शनाची गरज ओळखून सुसज्ज अभ्यासिकांची आणि डिजिटल लायब्ररीची निर्मिती करण्यावर भर देणार, त्याचबरोबर या परीक्षांतून प्रयत्नांती संधी न मिळाल्यास पर्यायी करिअर्स करण्यासाठीचे मार्गदर्शन आणि समुपदेशनाचीही सुविधा उपलब्ध करून देणार.
६) उद्योजकतेला प्रोत्साहन
रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्रित करणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना पदवीधरांना नवउद्योग विकसित करण्यासाठी आखण्यात आलेल्या आहेत. या योजनांची तपशीलवार माहिती देत स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी आणि नवउद्योग उभारण्यासाठी पदवीधरांना विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देणार.
७) महात्मा फुले इनक्युबेशन सेंटर्स
महात्मा जोतिबा फुले यांची या वर्षी द्विशताब्दी साजरी होत आहे. फुले दाम्पत्याने शिक्षणाला चालना दिल्यामुळेच महाराष्ट्र आज सर्वात प्रगत राज्य आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी उद्यमशीलतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. ती लक्षात घेता पदवीधरांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ५८ विधानसभा मतदारसंघात ‘महात्मा फुले इनक्युबेशन सेंटर्स’ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणार.
८) ‘जीसीसी’चा विस्तार
देशातील सर्वाधिक ‘ग्लोबल कैपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) आज मुंबई आणि पुण्यात आहेत. येत्या काळात माहिती-तंत्रज्ञानासह बौकंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, इन्शुरन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांचेही ‘जीसीसी’ मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या कंपन्यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा विचार करावा, यासाठी प्रयत्न करणार, त्यातून पदवीधरांना मोठ्या संधी उपलब्ध करून देणार, कोविड काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती स्वीकारली गेली आहे. हे लक्षात घेत ‘वर्क फ्रॉम होमटाऊन’ हे धोरण अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार.
९) वर्किंग विमेन होस्टेल्स
पदवी धारण करणाऱ्या महिलांना केवळ नोकरीसाठी अन्यत्र जावे लागण्यात अनेक समस्या असतात. त्यांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने वर्किंग विमेन्स होस्टेल्सची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. ‘म्हाडा’सारख्या संस्थांमार्फत वर्किंग विमेन्स होस्टेल विकसित करण्याचा पर्याय आजमावणार.
१०) मानसिक ताणाला प्रतिबंध
स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठीचा ताण प्रत्येक व्यक्तीला भेडसावतो आहे. पदवीधर तरुणही याला अपवाद नाही, पदवीधर तरुणांची रोजगाराअभावी अथवा अन्य संधीअभावी उमेद हरवते. आत्मविश्वास ढासळतो. याचे प्रमाण रोखणे आणि मानसिकदृष्ट्या समर्थ तरुणाई निर्माण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, यासाठी विशेष समुपदेशन केंद्र विकसित करणार.
११) अमली पदार्थापासून दूर ठेवणे
केंद्र सरकारने नशामुक्त अभियान सुरू केले आहे. अमली पदार्थांच्या मागे लागून जीवन उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. स्पर्धात्मक जीवन आणि अपयशाची भीती याही कारणांमुळे तरुण अमली पदार्थांकडे वळतात. तरुणांना त्यापासून परावृत्त करणे आणि देशाची सुरक्षितता जपण्यासाठी व्यापक अभियान राबविणार.
१२) पदवीधरांसाठी आर्थिक साक्षरता
आर्थिक साक्षरतेचा मुद्दा आपल्याकडे सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. पैसे कसे कमवायचे, याच्याबरोबर संपत्तीनिर्माण कशी करायची, याविषयी व्यापक जागरूकतेची गरज आहे. या दृष्टीने मोफत मार्गदर्शन केंद्रांची प्रत्येक तालुक्यात निर्मिती करणार. पदवीधर झालेल्या अनेक महिला घरकामात गुंतलेल्या असतात, त्यांनाही गुंतवणुकीच्या नव्या संधींची माहिती देण्यासाठी आणि आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी या केंद्रांद्वारे मार्गदर्शन केले जाईल.
१३) संवाद आणि संपर्क
पदवीधर मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे संपर्क आणि संवादाची चोख व्यवस्था मी उभी करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मी प्रत्यक्ष जनसंपर्क अभियान राबविणार आहे. त्याचप्रमाणे संपर्कासाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे. माझ्या कामाची माहिती देणारे नियतकालिक दर तीन महिन्यांनी प्रकाशित करण्याचा निर्धार आहे.
१४) कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग
पश्चिम महाराष्ट्राचा प्रगत कृषी व औद्योगिक क्षेत्र असा लौकिक आहे. हे लक्षात घेता कृषिपूरक, कृषिप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करणार. ग्रामीण भागातील पदवीधर तरुणांना त्याच्यामार्फत रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार.
१५) पदवीधर महिलांना पाठबळ
पदवीधर महिलांसाठी सुरक्षित वर्कस्पेस, कौशल्य प्रशिक्षण, उद्योग व्यवसायासाठी संधी, उपलब्ध असलेल्या वेळेनुसार रोजगाराच्या संधी देण्यासाठी पाठपुरावा करणार. मातृत्वामध्ये खंडित होणारी रोजगाराची संधी पुन्हा मिळण्यासाठीही आग्रह धरणार, भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांनी आपला संकल्पनामा जाहीर केलेला असून त्यांनी आपल्या नावासमोर पसंतीक्रमांक लिहून मत द्यावं, असे आवाहन मतदारांना केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



