ताज्या बातम्यासामाजिक
ह. भ. प. प्रदीप महाराज जाधव कविटगांव, करमाळा यांचे यशवंतनगर येथे सुश्राव्य कीर्तन होणार

शिवैवर्य धीरज शेटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
यशवंतनगर (बारामती झटका)
शिवैवर्य धीरज अशोक शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. 16/11/2016 रोजी शेटे वस्ती, यशवंतनगर येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. प्रदीप महाराज जाधव कविटगांव, करमाळा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त शेटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



