कर्नाटक राज्यात आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आ. राम सातपुते यांनी युवकांचा जोश व उत्साह वाढविला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कर्नाटक राज्यात बल्लारी, कोप्पल, रायचूर, विजयनगर जिल्ह्यात पक्षाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून बाईकने तिरंगा रॅलीने वातावरण ढवळून काढले.
रायचूर ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भाजपचे संस्कार राजस्थानमध्ये जपून कर्नाटक राज्यात आझादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅलीने कर्नाटक राज्यात वातावरण ढवळून काढून आमदार राम सातपुते यांनी युवकांचा जोश व उत्साह वाढविलेला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वरिष्ठ नेत्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे व निष्ठेने पार पाडून भाजपचे संस्कार अंगीकृत केलेले आ. राम सातपुते यांनी कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील कुश्तगी, बल्लारी जिल्ह्यातील शिरगुप्पा, रायचूर जिल्ह्यातील मस्की, विजयनगर जिल्ह्यातील कुडलिंगी मंडल अशा ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या तिरंगा बाईक रॅलीला उपस्थित राहून देशभक्तीने भारावलेल्या युवकांमध्ये सहभागी होऊन देशभक्तीचा आनंद लुटला.


भारत देशाचे लोकप्रिय व संवेदनशील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश जोषाने विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. आझादी का अमृत महोत्सव निमित्त देशामध्ये बाईक रॅलीचे आयोजन सुरू आहे. आमदार राम सातपुते यांच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटक राज्याची दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून भाजपचे संस्कार रुजलेले असल्याने युवकांमध्ये ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण भारताचा ७५ वा आझादी का अमृत महोत्सव जोशात व उत्साही वातावरणात सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

