पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भांब गावचे बिनविरोध सरपंच प्रफुल्ल उर्फ पप्पू काळे यांचा सन्मान केला..

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी माळशिरस तालुक्यातील भांब गावचे बिनविरोध नूतन सरपंच प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू काळे यांचा सन्मान केला. यावेळी म्हसवड गावचे युवा नेते लुनेश शेट विरकर, अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गोरे, बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे आलेले होते. यावेळी भांब गावचे नूतन सरपंच प्रफुल्ल उर्फ पप्पू काळे यांचा आवर्जून सत्कार करण्यात आला.
भांब, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सरपंच बकुबाई राजेंद्र काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड सोमवार दि. 16/6/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे मंडल अधिकारी तथा निवडणूक अध्याशी अधिकारी श्री. रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी प्रफुल्ल पांडुरंग काळे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य बकुबाई राजेंद्र काळे, बाळाबाई धुळा पांढरे, पोपट दगडू सरगर, सोपान गणपत काळे, संगीता बाळू काळे आदि सदस्य उपस्थित होते. यावेळी निवडणूक प्रक्रिया सहकार्य ग्रामसेवक आर. बी. काळे यांनी केलेले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी श्री. रणदिवे यांनी दुपारी दोन वाजता प्रफुल्ल काळे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केलेली होती.

प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू काळे यांनी भांब गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळलेली होती. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदावर काम केलेले आहे. समाजामध्ये पप्पू काळे यांनी कार्यात्मक आपली ओळख निर्माण केलेली आहे. श्रीक्षेत्र संभाजी बाबा येथे भांबपासून जाण्याकरता रस्त्यावर सर्व चिलार उगवलेले होते, चार चाकी नव्हे तर, दोन चाकी गाडी जाण्यासाठी सुद्धा बाजूची झाडे अडचण करीत होती. अशावेळी पप्पू काळे यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून दोन्ही बाजूची झाडे काढून रस्ता खुला केलेला होता. मुलीच्या वाढदिवसाला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांना मोफत खिचडी देण्यात आलेली होती. गावामध्ये सामाजिक कार्यात पप्पू काळे यांचा सिंहाचा वाटा असतो. भांब गावांमध्ये उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष व बिनविरोध सरपंच असे महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण करून पप्पू काळे यांनी समाजामध्ये आपल्या काळे परिवाराचा नावलौकिक केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.