चि. चंद्रकांत धाईंजे आणि चि. सौ. कां. भाग्यश्री खरात यांचा मंगल परिणय सोहळा होणार संपन्न

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
वेळापूर (बारामती झटका)
कालकथित. नरेंद्र विनायक धाईंजे रा. वेळापूर, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. चंद्रकांत आणि आयु. विजय सुभाष खरात रा. टेंभुर्णी, ता. माढा यांची सुकन्या चि. सौ. कां. भाग्यश्री यांचा मंगल परिणय सोहळा सोमवार दि. २७/११/२०२३ रोजी सायं. ६.१५ मि. या शुभ मुहूर्तावर फुले-शाहू+आंबेडकर नगर वेळापूर, जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे, वेळापूर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या मंगल परिणय सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास, हेच आमंत्रण समजून आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती धाईंजे आणि खरात परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.