विधीसेवा फाऊंडेशनच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
माळशिरस (बारामती झटका)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माळशिरस येथील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विधीसेवा फाऊंडेशनच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमावेळी विधीसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय बाबर, उपाध्यक्ष ॲड. भारत गोरवे, सचिव ॲड. सुमित सावंत, खजिनदार ॲड. गोपाळ लावंड, सदस्य जुल्कर शेख, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. वैशाली कांबळे, अवधूत कांबळे, सुप्रिया पोळ, आबासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, ॲड. मनोज धाईंजे, ॲड. शाहीन पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे समाधान असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


समाजातील वंचित, गरजू व दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी असून, विधीसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही कायदेविषयक जनजागृतीसोबत विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा निर्धार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



