ह. भ. प. प्रा. राहुल पाटील महाराज, आळंदी यांचे जाधव वस्ती, येळीव, मायनर फाटा नं. ५८ येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

कै. दादा वाघमोडे (बोकफोडे) यांच्या पुण्यस्मरण निमित्त कीर्तन पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन
येळीव (बारामती झटका)
येळीव, ता. माळशिरस येथे कै. दादा गंगाराम वाघमोडे (बोकफोडे) यांच्या त्रुतीय पुण्यस्मरणाचे आयोजन रविवार दि. ३१/५/२०२६ रोजी जाधववस्ती, येळीव, मायनर फाटा नं. ५८ येथे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. प्रा. राहुल पाटील महाराज, आळंदी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी किर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. संभाजी दादा बोकफोडे, श्री. धनाजी दादा बोकफोडे, श्री. तानाजी दादा बोकफोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे (बोकफोडे) परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



