ताज्या बातम्यासामाजिक

महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांचे सह खाजगी इसम अँटी करप्शन च्या जाळ्यात..

सोलापूर (बारामती झटका)

लोकसेवक भारत पांडुरंग व्हनमाने वय ४५ वर्ष पद अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, सोलापूर (वर्ग १) व लोकसेवक श्रीमती स्वाती सदानंद सलगर वय – ४० वर्ष पद सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, सोलापूर शहर (वर्ग – २) तसेच योगीनाथ गैरप्पा म्हेत्रे वय २७ (खाजगी इसम) यांनी सोलार सिस्टीमच्या मंजुरीच्या अनुषंगाने प्रती वेंट रु. १०००/- प्रमाणे एकुण रु. १६०००/- लाचेची मागणी करुन रु. ८०००/- लाच रक्कम स्विकारली असून फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सोलापूर युनिट पुणे परिक्षेत्र अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७७अ, १२ प्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

१) लोकसेवक भारत पांडुरंग व्हनमाने वय-४५ वर्षे पद- अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, सोलापूर वर्ग-१ रा. जुनोनी ता. सांगोला जि. सोलापूर.

२) लोकसेवक श्रीमती स्वाती सदानंद सलगर वय-४० वर्षे पद सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, सोलापूर शहर रा. अभिषक नगर, वी १, जुळे सोलापूर वर्ग- २

३) योगीनाथ भैरप्पा म्हेत्रे वय २७ (खाजगी इसम) रा.मुपो. हत्तुर ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर.

पडताळणी दि. १६/०५/२०२५ रोजी, दि. १९/०५/२०२५ व यशस्वी सापळा कारवाई दि. २०/०५/२०२५ रोजी.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांचा सोलार पावर सिस्टीम बसविण्याचा व्यवसाय आहे. सोलार सिस्टीमच्या मंजुरीच्या अनुषंगाने स्थळांची पाहणी करुन, कामाची मंजुरी देवुन मिटर बसविण्यासाठी आरोपी क्र. ३ योगीनाथ म्हेत्रे यांनी आरोपी क्रं. १ व आरोपी क्रं. २ यांना प्रती वेंट रु. १०००/- प्रमाणे रु. १६०००/- दयावे लागतील, त्यानंतर तुमचे काम करण्यात येईल असे सांगितले. त्याप्रमाणे दि. १६/०५/२०२५ रोजी व दि. १९/०५/२०२५ रोजी आरोपी लोकसेवक क्रं. १ व २ यांची पडताळणी केली असता आलोसे क्र. १ यांनी रु. ५०००/- व आलोसे क्रं. २ यांनी रु. ३०००/- लाचेची मागणी करुन आरोपी क्र. ३ यांच्याकडे देण्यास सांगितले. यावरुन आज रोजी महावितरण कार्यालय, जुनी कंपाऊंड येथे आरोपी क्रं. ३ योगीनाथ म्हेत्रे यांनी रु. ८००० लाच रक्कम स्वतः स्विकारली आहे. वर नमुद लोकसेवक व खाजगी इसम यांचे विरुध्द फौजदार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक लाप्रयि, पुणे, डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. सोलापूर यांच्या, श्री. गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, सोलापूर, पोलीस अंमलदार ग्रेड पोसई/एम.जी. चडचणकर, एएसआय/एस.व्ही. कोळी, पोना/३० एस.ए. नरोटे, पोशि/७६६ जी.व्ही. किणगी, पोशि/२२२२. आर. आर. हटखिळे व चालक पोकॉ/१६०८ शाम सुरवसे सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर या सापळा पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्यांच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा. संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल – [email protected], [email protected]
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button