ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची बदली….

वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पुनश्च डॉ. आबासाहेब पवार यांची नव्याने नियुक्ती झाली पुन्हा पॅवेलियनमध्ये परत गेले..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर नव्याने नियुक्ती झालेली आहे. विनंती बदलीमध्ये श्री. रघुनाथ पांढरे माळशिरस पंचायत समिती येथे आले व डॉक्टर आबासाहेब हरि पवार वाळवा पंचायत समिती येथे गेले.

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. मनोज बापूराव राऊत यांची प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली झाल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नव्याने नियुक्ती झालेली होती. डॉ. आबासाहेब हरी पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वाळवा, जि. सांगली, येथे कार्यरत होते.

डॉ. आबासाहेब हरी पवार यांचे पशु वैद्यकीय शास्त्रात एम.व्ही.एस.सी. (M.V.Sc.) शिक्षण झालेले आहे. २००१ च्या बॅचमधील एमपीएससी मधून निवड झालेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, कागल, सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केलेले होते. अनुभवी असणारे डॉ. आबासाहेब पवार यांचे माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर लोकाभिमुख प्रशासन चालवलेले होते. डॉ. आबासाहेब पवार यांना पुन्हा वाळवा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर काम करण्याची पुन्हा संधी मिळालेली असल्याने पॅव्हिलिनमध्ये परत गेलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button