ताज्या बातम्यासामाजिक

रणजीतदादा, जयाभाऊ आणि रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर

वेळापूर (बारामती झटका)

स्वराज साखर कारखान्याच्या चेअरमन तथा सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. रणजितदादा नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वेळापूर येथून पुढे प्रवासादरम्यान ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी वेळापूर शेरी येथील भाजपचे कार्यकर्ते अमृतराज माने-देशमुख व अमरसिंह माने-देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सौ. नीलम अमृतराज माने-देशमुख, सौ. वैष्णवी अमरसिंह माने-देशमुख आणि सौ. अदिती अभयसिंह माने-देशमुख यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी अमृतराज माने-देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले असून कर्जमाफी, साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषी पंपांच्या वीजबिलांबाबत दिलेला दिलासा यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माने-देशमुख परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button