ताज्या बातम्याशैक्षणिक

पद्मविभूषण शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या नाविन्यपूर्ण मिरवणुकीने वेधले पिलीवकरांचे लक्ष

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कै. रमेश खलीपे कनिष्ठ महाविद्यालय पिलीव व स्थानिक स्कूल कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या नाविन्यपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रथमत: विविध पुष्पमालांनी गुंफलेल्या आणि सजविलेल्या कर्मवीर रथामधील कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे व कर्मवीर रथाचे पूजन जि. प. सोलापूर कृषी व पशुसंवर्धन समितीचे मा. सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांचे हस्ते व लोकनियुक्त सरपंच नितीन मोहिते, माजी सरपंच संग्राम पाटील, उद्योगपती प्रकाश आबा जाधव, उमेश देशमुख, प्राचार्य एस. डी. कापसे सर व त्यांचा सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून नाविन्यपूर्ण अशा कर्मवीर रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. कर्मवीर विद्यालयापासून सातारा-पंढरपूर महामार्गावरून पिलीव नगरीच्या मुख्य पेठेत कर्मवीर रथाचे प्रस्थान झाले. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आणि तोफांच्या सलामीत ग्रामस्थांनी व पत्रकार बांधवांनी कर्मवीर रथाचे स्वागत केले.

सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर सडासमार्जन व रांगोळीच्या रूपातून आगतम स्वागतमच्या रूपाने पुष्पवृष्टी करून या नावीन्यपूर्ण रथाची सजावट व अनोखी मिरवणूक काढल्याबद्दल प्राचार्य शिवाजीराव कापसे सर यांचे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफचे अभिनंदन करून मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या कलात्मक गुणातून अण्णांच्या जीवनपटावरील गीतांच्या, व विविध वाद्यांच्या तालावर लेझीम, टिपरी व इतर विद्यार्थ्यी कलाकारांच्या विविध कलांचे माध्यमातून सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधलेल्या ग्रामस्थांनी या मिरवणुकीचे लक्ष वेधले असता सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थी वर्गाबरोबरच सर्व शिक्षक, स्टाफ यांच्यावरतीही कौतुकाचा वर्षाव केला. व विद्यार्थी वर्गाकडून “वडाची फांदी लावलीच पाहिजे, रयत शिक्षण संस्था वाढलीच पाहिजे”, “ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा” या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. यावेळी नाविन्यपूर्ण कर्मवीर रथाच्या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. बाजार तळावरती मिरवणूक आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्यावतीने सर्व ग्रामस्थांचे जाहीर आभार मानून मिरवणुकीची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort