मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ), सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, आ. उमाताई खापरे, आ. राहुलदादा कुल, आ. गोपीचंद पडळकर, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. देवेंद्र कोठे, आ. हेमंत रासने, आ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



