मांडवे गावचे प्रगतशील बागायतदार जगन्नाथ सोपान पालवे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच तानाजीआबा जगन्नाथ पालवे पाटील यांना पितृशोक….
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार जगन्नाथ सोपान पालवे पाटील यांचे गुरुवार दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सहा भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी आबा पालवे पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्यावर मांडवे गावातील लक्ष्मीनगर येथील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये सकाळी 08 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

स्वर्गीय जगन्नाथ पालवे पाटील यांच्या दुःखद निधनाने पालवे पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पालवे पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व आत्म्यास शांती लाभो हीच, बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.