अकलूज येथे श्री श्री रवीशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि परिचारिका दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)
आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर संस्थापक गुरूदेव सद्गुरू श्री श्री रवीशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० वा. पर्यंत सहारा इन्स्टिट्यूट हॉल माळेवाडी, कॉलेज रोड, अकलूज, ता. माळशिरस भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस स्टेशन अकलूज, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अकलूज, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज, डॉ. श्रद्धा जवंजाळ अध्यक्ष पिंक रेवोल्युशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.

रक्तदान एक महादान आहे. रक्तदान ही काळाची गरज आहे. आणि हीच गरज ओळखून आपण सर्वांनी रक्तदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण इतरांना मदत करू शकू आणि त्यांचे जीवन वाचवू शकू. या रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी प्रा. धनंजय देशमुख सर ९२६०७१०७१०, श्री. माऊली मुंडफणे, प्रशिक्षक ९९२२१४०१०५, श्री. विश्वास साळोखे माजी पोलीस अधिकारी अकलूज पोलिस स्टेशन ९८२३३३६७६७ यांच्याशी संपर्क साधावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.