ताज्या बातम्याराजकारण

कण्हेर गावचे युवा नेते धर्मा माने यांनी दरवाजा उघडला आहे, मतदानातून अनेक धर्मा माने तयार होणार आहे….

माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी मोहिते पाटील यांचा 100% कार्यकर्ता असणाऱ्याने बंडाची भूमिका घेतल्याने कौतुक केले…

कण्हेर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने यांची ओळख धर्मा या नावाने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर साता समुद्रापलीकडे निर्माण केलेली होती. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार विकास कामांमुळे कण्हेर गावचे युवा नेते धर्मा माने यांनी माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील यांचे 100% कार्यकर्ते असणारे अनेक आहेत. पहिल्यांदा दरवाजा उघडण्याचा काम धर्मा माने यांनी केलेले असून मतदानाच्या पेटीतून अनेक धर्मा माने तयार होणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रसाद लाड यांनी मोहिते पाटील यांचा 100% कार्यकर्ता असणाऱ्या धर्मा माने यांनी बंडाची भूमिका घेतल्याने कौतुक करून भेट घेऊन धन्यता मानतो, अशा पद्धतीने गौरवोद्गार करून शाबासकीची थाप पाठीवर मारली.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना महायुतीची सोलापूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करून माळशिरस तालुक्यात केलेल्या विकास कार्यातून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचे सांगून मतदार संघात केलेल्या विकास कार्याचा पाढा वाचत असताना अनेकांची अडचणीची व कधीच न झालेली कामे केलेली असल्याने अधिकाराने आमदार राम सातपुते उपस्थित कार्यकर्त्यांना बोलत होते. त्यामध्ये मोहिते पाटील यांचा 100% असणारा कार्यकर्ता कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने यांच्याकडे आमदार यांची नजर गेल्यानंतर ये धर्मा असा उल्लेख करून मतदान किती करणार, विकास कामे केलेली आहेत, मतदान जास्त झाले पाहिजे, असे अधिकार वाणीने सांगितलेले होते.

त्यावेळेला सोलापूर येथील विरोधी उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आपल्या फेसबुक व इन्स्टावर ‘ए धर्मा’ असे वाक्य टाकून धर्मा सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला होता. तालुक्यातील मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक यांनी सुद्धा सदरची पोस्ट फिरवलेली होती. धर्मा माने यांना आमदार राम सातपुते यांच्या विरोधात मुलाखत देण्यासाठी अनेकांनी विनवण्या केल्या. मात्र, धर्मा माने यांनी जुनी मैत्री जपली. राम सातपुते आमदार होण्याअगोदर एकत्र वावरत होते. एकाच ताटामध्ये जेवण केलेले असे जिवाभावाचे मित्र होते. मैत्रीसाठी 100% मोहिते पाटलांचा असणारा कार्यकर्ता युवानेते धर्मराज माने यांनी आमदार राम सातपुते यांच्या सोबत राहून भारतीय जनता पक्षाचे कमळ हातात घेतलेले होते. याचे कौतुक माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort