मांडवे येथे युवा कीर्तनकार ह.भ.प. पायलताई घुले यांचे कीर्तन होणार
कै. सौ. मालन गोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस, येथे कै. सौ. मालन बलभीम गोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. पायलताई घुले, घुलेनगर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रविवार दि. २१/०५/२०२३ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत मेन कॅनॉल, ५० फाटा, मांडवे येथे करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर १२.०५ मिनिटांनी पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. सौ. मालन गोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ समस्त ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन गोरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. आमंत्रण देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन गोरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng