माणसाने ‘अजितदादां’ सारखं उंच व्हावं, बारामतीत सोशल मीडियावर सर्वत्र ‘अजितदादां’ ची चर्चा
बारामती (बारामती झटका)
माणसानं ‘अजितदादां’ सारखं उंच व्हावं, रुसून बसला तरी त्याची राज्यात बातमी व्हावी, फोन बंद केला तर माध्यमांची हेडलाईन व्हावी, एक दिवस सुट्टी घेतली तर ब्रेकिंग न्यूज व्हावी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या दिवशी पहाटे उठल्याची तब्बल चार वर्ष चर्चा व्हावी. बाकी कोणी काहीही म्हणो, पण दादा इस ब्रँड. अशाप्रकारे आज बारामतीत दिवसभर सोशल मीडियावर सर्वत्र ‘अजितदादां’ चीच चर्चा होती. अजितदादा समर्थकांनी आजचा दिवस या चर्चांनी गाजवला.
सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगल्याचे चित्र होते. यामध्ये सोशल मीडियावर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार, पवार फडणवीस पुन्हा एकत्र येणार, राष्ट्रवादी भाजप पुन्हा युती होणार. ‘अजितदादां’ कडे भाजप सोबत जाण्यासाठी ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचे पत्र अजितदादा राज्यपालांना भेटणार, अशा माध्यमांमध्ये असणाऱ्या चर्चांनी मंगळवारी (दि. १८) सकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र, राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रमुख गोटात याबाबत केवळ शांतता होती दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने बारामतीकरांमध्ये चांगला संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सकाळी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी अजितदादा पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत खंडन केले. जिवातजीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार. नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नसल्याचे खुद्द अजितदादा पवार यांनी सांगितले आहे.
तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी
अजितदादांच्या बातम्या दाखवून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने झालेल्या मृत्यूचे पाप झाकता येणार नाही. तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी अजितदादांच्या नावाचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप देखील सोशल मीडियावर करण्यात आला. आज दिवसभर अजितदादा चर्चेचा विषय होते.
समर्थक सरसावले
राजकीय चर्चा आणि घडामोडींवर ‘दादा’ समर्थकांनी व्यक्त होण्यास सुरुवात करीत भूमिका मांडली. दादा तुम्ही आला तरी चर्चा, गैरहजर राहिले तरी चर्चा, बोलला तरी थोडी; पण नाही बोलला तर महाचर्चा, तुम्ही हसला तरी चर्चा, दिसला तरी चर्चा, नाही दिसला तरी चर्चा, तुमच्या विकासकामांची चर्चा, तुमच्या भाषणांची चर्चा, काळ्या गॉगलची चर्चा, तुमच्या कामाच्या झपाट्याची चर्चा, पहाटे उठण्याची चर्चा, कौतुकाचीही होते चर्चा, सर्वत्र तुमच्या चर्चा, कारण लाईन वहीसे सुरू होती है, जहाँ अजितदादा खडे होते है. कुणी पक्ष बदलेल, कुणी इमान बदलेल, कोणी झेंडे बदलले, कोणी नेते बदलले, कुणी नोटा बदलल्या, पण ना आम्ही इमान बदलला, ना निष्ठा, ना झेंडा, न नेता. आपल्यासाठी एकच पक्ष अजितदादा. एक खंबीर व सक्षम प्रतिभाषाली समाजकारण, अशा शब्दात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थक व्यक्त झाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng