सोलापूर जिल्हा परिषद प्रज्ञा शोध परीक्षेत जि. प. प्रा. शाळा कदमवाडीच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

कदमवाडी (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत कदमवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत शाळेतील प्रणव रविंद्र पुराणे याने जिल्हा पातळीवर 15 वा क्रमांक पटकावला व तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक, तर राजवीर गणेश कदम याने जिल्हा पातळीवर 16 वा व तालुका पातळीवर तृतीय क्रमांक मिळवून विशेष नैपुण्य सिद्ध केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. दादाराव जगताप सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन पुराणे सर, पदवीधर शिक्षक श्री. प्रवीण बागुल सर, श्रीम. सारिका धुमाळ मॅडम व श्रीम. अनिता थोरात मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, गटशिक्षणाधिकारी मॅडम, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक बांधवांच्यावतीने विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले आहे.
भविष्यातही शाळेचे विद्यार्थी अशाच प्रकारे चमकदार कामगिरी करतील याची आम्हाला खात्री आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



