ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा स्वागताचा “गुच्छ” का ? वाटला “तुच्छ”..


शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची राजकीय डबल ढोलकी वाजवण्यास लगाम बसला…

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 28/04/2024 रोजी सायंकाळी विजय चौकामध्ये जाहीर सभेसाठी सांगोला येथील सभा आटपून अकलूजमध्ये येत असताना मुख्य रस्त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वागतासाठी गुच्छ आणून स्वागतासाठी सज्ज होते‌. मात्र, गुच्छ न स्वीकारता ताफा सभेच्या ठिकाणी रवाना झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा स्वागताचा गुच्छ का वाटला तुच्छ ?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.

शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी प्रामाणिकपणे काम केलेले होते. त्यामुळे भाजपने विशेष करून देवेंद्रजी फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केले. अडचणीत असलेल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत केली. विविध विकासकामांना निधी दिला व इतरही अडचणीची कामे केलेली होती. भारतीय जनता पक्षामध्ये मानसन्मान सुरू होता मात्र, भाजपमध्ये राहून पक्षविरोधी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

माढा लोकसभेचे कार्यकर्ते व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना व भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचे काम सुरू झाले. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जाणीवपूर्वक टारगेट करून बदनाम करण्याचे काम सुरू केलेले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे देशातील दहा खासदारांमध्ये काम आहे, त्यामुळे त्यांच्या नावाचा भाजपचे वरिष्ठ नेतृत्व विचार करतील, असे सांगितल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा टीका टिपणी केलेली होती. संकट मोचन जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन शिवरत्न बंगला येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांना हुसकावून असभ्य व संस्कृती सोडून दिलेली वागणूक, पक्ष विरोधी केलेल्या कारवाया तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा एकेरी उल्लेख करून हीन दर्जाची पातळी सोडून वक्तव्य केलेले आहेत, अशा सगळ्या गोष्टी देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पक्ष पाहत होते.

जयसिंह मोहिते पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्रांना ओळखत नाही असेही वाक्य बोललेले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत असताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना आम्ही वाळीत टाकलेले असून ते भाजपमध्येच राहतील, असेही समाज माध्यमांना सांगण्यात आले. शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवाराची राजकारणातील डबल ढोलकी वाजविण्याची मानसिकता राजकीय चाणक्य असणारे देवेंद्रजी फडवणीस यांनी ओळखली. तेंव्हापासून निकटवर्तीयांना सक्त सूचना केल्या. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या मोहिते पाटील यांचे नाव सुद्धा माझ्यासमोर घ्यायचे नाही.

माढा लोकसभेच्या निवडणुकीत अनेक स्थित्यंतरे घडलेली आहेत. देवेंद्रजी फडणवीस लक्ष ठेवून होते. शिवरत्नवरील मोहिते पाटील यांना वगळून राजकीय गणिताची गोळाबेरीज करण्याचे काम सुरू आहे. शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपत असताना राजकीय ताकद देऊन सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विरोध केलेला असल्याने शिवरत्न वरील मोहिते पाटील देवेंद्रजी फडवणीस यांच्या डोक्यात बसलेले आहे. तालुक्यातील शिष्टमंडळ व नेतेमंडळी यांना भेटल्यानंतर देवेंद्रजी फडवणीस यांनी आवर्जून सांगितलेले होते माझे चांगले रूप पाहिलेले आहे दुसरे रूप अजून पाहिलेले नाही. याचा प्रत्यय अकलूज येथील जाहीर सभेच्या प्रसंगाने आलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित असताना “आईसाहेब” असा उल्लेख करून भविष्यात प्रतापगडाला ताकद देण्याचे संकेत दिलेले आहेत. शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची एक जण भाजपमध्ये दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात अशी डबल ढोलकी वाजविण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मनसुबा धुळीला मिळविलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा स्वागताचा गुच्छ न स्वीकारता त्यांना तुच्छ वाटला असावा. भविष्यामध्ये देखो आगे आगे क्या होता है, जस्ट वेट अँड वॉच, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort