ताज्या बातम्यासामाजिक

रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आरोपी मोकाट पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह…

बनावट खोट्या सह्या करून नकली कागदपत्रे तयार करून बनावट कर्ज उचलून रकमेचा गैरवापर करणारे सचिव पोलीस कस्टडीत मात्र चेअरमन व संचालक मंडळ अद्याप मोकाट का ?

माळशिरस (बारामती झटका)

रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर तालुका माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या विरोधात दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी तक्रार दिलेली होती. सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीस यांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली होती. आज सोमवार दि. 12/10/2026 रोजी पोलीस कस्टडी संपणार आहे. माळशिरस पोलीस प्रशासन पोलीस कस्टडी पुन्हा मागणार का?, अशी चर्चा सुरू असताना पाच दिवस सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना पोलीस कस्टडी असताना बनावट खोट्या सह्या करून नकली कागदपत्रे तयार करून बनावट कर्ज उचलून रकमेचा अपहार करणारे सचिव पोलीस कस्टडीत मात्र चेअरमन व संचालक मंडळ अद्याप मोकाट का ?, अशी सहकारी क्षेत्रामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून चेअरमन व संचालक मंडळ आरोपी अद्याप मोकाट का ? असा माळशिरस पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..

……….तर दुसरीकडे
पोलीस कस्टडीमध्ये पतसंस्थेचे बिंग फुटू नये यासाठी पतसंस्थेचे संबंधित हितचिंतक प्रमोद अनंतलाल दोशी व सोमनाथ रामचंद्र राऊत यांनी तक्रारदार दिपक गोरे यांना धमकी व शिवीगाळ करून तक्रार मागे घे नाहीतर काय खरं नाही, असे म्हणाले असल्याने दीपक गोरे यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे प्रमोद दोशी व सोमनाथ राऊत यांच्यावर एनसी दाखल केलेली आहे. खरंच पाणी कुठे मुरतय रत्नत्रय पतसंस्थेच्या बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीने वेगळे वळण घेतलेले आहे…

तक्रारदार दीपक गोरे यांनी दिलेल्या मूळ तक्रारी अर्जां मधील हकीगत अशी, रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत, संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465, 468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला होता.

माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून गुन्ह्यामधील मास्टर माईंड रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीसांनी
मेहरबान न्यायालयाने दिलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करून पुढील तपास करण्याकरता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती.

सदर गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले करीत आहेत. त्यामुळे प्रकरणाच्या मुळाशी जाऊनच तपास होणार आहे. संस्थेचे चेअरमन व सर्व संचालकांसह खाजगी सावकार यांची शोध मोहीम सुरू आहे. पतसंस्थेचे सचिव जेवढे जबाबदार तेवढेच चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असते. सदर गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले करीत आहेत. पोलीस प्रशासनाकडून फक्त तपास करण्याचा फार्स केला जातोय मात्र, प्रत्यक्षात वेगळीच असल्याची चर्चा सदाशिवनगर पंचक्रोशीत सुरू आहे.

माळशिरस पोलीस स्टेशनची गाडी फक्त सदाशिवनगर परिसरात फिरून येत आहे. आरोपी मात्र अटक केला जात नाही. यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

तपास अधिकारी श्री. विशाल नवले यांच्याशी संपर्क साधून चेअरमन व संचालक मंडळ तक्रारदार यांना धमकवणारे प्रमोद दोशी, सोमनाथ राऊत यांची शोध मोहीम सुरू आहे का ? नाही ?, तपास करताना संबंधित लोकांचे मोबाईल ट्रेकिंग टाकले होते का, घटना घडल्यापासून संबंधित आरोपी सदाशिवनगर परिसरामध्येच वावरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या सर्व बाबींची चर्चा करून सविस्तर बातमी पुढील भागात….

सदरच्या गुन्ह्यातील चेअरमन व संचालक मंडळ अद्याप मोकाट असताना सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना पोलीस कस्टडी मिळण्यासाठी तपास अधिकारी प्रयत्न करतील का ? हेही पाहणे गरजेचे असल्याचे पिडीतांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button