७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची तयारी पूर्णत्वाकडे !
बारामती (बारामती झटका)
संत निरंकारी मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ दि. १६ नोव्हेंबर रोजी होत असून हा समागम २० नोव्हेंबर पर्यंत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा ग्राउंड (हरियाणा) येथे आयोजित केला जात आहे.
या भव्यदिव्य संत समागमचा आनंद घेण्यासाठी बारामती परिसरातील हजारोच्या संख्येने निरंकारी अनुयायी जाणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
७५ वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वयमेव एक ऐतिहासिक व अनोखा आहे. कारण या दिव्य संत समागमांच्या अविरत श्रृंखलेने आजवर ७४ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.
या संत समागमात महाराष्ट्रासह देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी होतील. समागम स्थळावर भव्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भक्तगणांची राहण्याची तसेच लंगर (भोजन) इत्यादिची उचित व्यवस्था असेल. शिवाय प्रत्येक मैदानावर स्वतंत्र कैन्टीनची सुविधा दिली जाणार आहे. त्यामध्ये अल्पोपहार इत्यादि सवलतीच्या दराने उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त मैदानांवर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
त्या बरोबरच पार्किग, सुरक्षा इत्यादिची देखील समुचित व्यवस्था केली जात आहे. जेणेकरून येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय भासू नये. सत्संग पंडालच्या आजूबाजूला संत निरंकारी मंडळाचे विविध विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादींची कार्यालयेही असतील. प्रकाशन विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावण्यात येतील. या शिवाय मिशनचा इतिहास व संपूर्ण समागमचे मुख्य आकर्षण स्वरूपात निरंकारी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/ar/register-person?ref=W0BCQMF1