गोरे यांच्या नव्या पाहुण्याच्या बारशाला राजकीय नेत्यांची मांदियाळी उपस्थित राहणार, बाळाच्या बारशाला कोण कोण येणार…
बारश्याच्या मुठ मुठ घुगऱ्या खाऊन उपस्थित ढेकर देणार तर विरोधकांच्या पोटात मोकळ्यात कुट कुट करून गॅस तयार होणार….
पुरंदावडे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील सौ. रंजना व श्री. गोपाळ बाबा गोरे यांचे नातू व सौ. भक्ती व श्री. दत्तात्रेय गोपाळ गोरे यांच्या चिरंजीवांच्या नामकरण बारशाचा कार्यक्रम नाळे मळा पुरंदावडे, ता. माळशिरस येथे शुक्रवार दि. 07/04/2023 रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होणार आहे. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याबरोबर तालुक्यातील राजकीय नेत्यांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. सध्या राजकीय वातावरण अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे तापत असताना बारशाच्या मुट मुट घुगऱ्या खाऊन उपस्थित ढेकर देणार तर विरोधकांच्या पोटात मोकळ्यात कुट कुट करून गॅस तयार होणार, अशी सस्नेह निमंत्रणाची पत्रिका पाहिल्यानंतर तालुक्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील राजकीय मंडळी यांची उपस्थिती राहणार, त्यामध्ये बारशाला कोण कोण येणार आहेत, निमंत्रण पत्रिकेमध्ये उपस्थितांची नावे अशी आहेत, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ वाघमोडे, काँग्रेस आय. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंत उर्फ दादाराजे घाडगे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पांडुरंग वाघमोडे, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, मेडद गावचे माजी सरपंच युवराज झंजे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाईंजे, जनसेवा संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष दादासाहेब जाधव, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर वाघमोडे पाटील, ज्येष्ठ नेते विलास निंबाळकर, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे माजी संचालक पांडुरंग सालगुडे पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील गोरे, त्रिमूर्ती केसरी प्रताप झंजे, मांडवे गावचे माजी सरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत पालवे, ज्येष्ठ नेते गुलाब निंबाळकर, युवा नेते कालिदास रुपनवर, माळशिरसचे माजी सरपंच विकास धाईंजे, आप्पासो भुजबळ, सदाशिवनगरचे माजी सरपंच नागनाथ ओवाळ, फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, समाजरत्न पत्रकार सुरेशनाना शेंडे, मेडदचे माजी उपसरपंच शिवाजी लवटे, बाळासाहेब सालगुडे पाटील, गोरडवाडी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, सदाशिवनगरचे माजी उपसरपंच माणिक सुळे पाटील, आंतरराष्ट्रीय धर्मपीठ न्यास परिषदेचे राष्ट्रीय प्रभारी ह. भ. प. मोहनानंद महाराज अशी राजकीय नेते मंडळी यांची मांदियाळी उपस्थित राहणार आहेत.

पुरंदावडे गावामध्ये बारशाच्या कार्यक्रमाला नातेवाईक, मित्रमंडळी यांचेसोबत राजकीय नेत्यांची विशेष उपस्थिती असल्याने या बारशाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng