Uncategorized
कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महावीर धायगुडे तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची आज कुसमोड ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी सरपंच पदासाठी महावीर उर्फ पुरुषोत्तम पांडुरंग धायगुडे व तुषार माधव लवटे यांचे अर्ज आले होते तर उपसरपंच पदासाठी स्वाती नाथा मदने यांचा एकमेव अर्ज आला होता.सरपंच पदासाठी तुषार लवटे यांनी भरलेला अर्ज माघारी घेतल्याने सरपंच पदी महावीर धायगुडे यांची तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ यांनी जाहीर केले .या निवडीवेळी माजी सरपंच तुषार लवटे, माजी उपसरपंच राणी पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे,बाळकृष्ण धायगुडे, रेखा पालखे, शारदा धायगुडे हजर होते तर उमा कचरे गैरहजर राहील्या. निवडीनंतर नुतन सरपंच व उपसरपंच यांचा माजी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर निवडीवेळी मनोहर लवटे, डॉ सुरेश सातपुते, तानाजी शेंडगे,भिवा शिंदे,लक्ष्मण पवार, माजी उपसरपंच संजय पाटील, गोपाळ माळी,शहाजी लेंगरे,उत्तम मोरे,अनंता धायगुडे, अशोक लेंगरे, नाथा मदने, शशिकांत घडयाळे,गणेश लेंगरे,सोमनाथ वाघमारे, अशोक राजगे,नितीन मोरे,सुभाष जाधव, देवा धायगुडे, कैलास धायगुडे, सिद्धेश्वर पाटील, विजय धायगुडे गुरुजी,किशोर लवटे, श्याम धायगुडे, उमाजी बोडरे, देवानंद चव्हाण, अशोक चव्हाण, बापु धायगुडे, शिवाजी धायगुडे, यांच्यसह अनेक मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन सदस्यांनचा सत्कार करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. सर्व निवडणुक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ ,सहहयाक ग्रामसेवक कोरबु,याच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली.दरम्यान यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली .तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश धुमाळ व इतर सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.
Czy istnieje lepszy sposób na szybkie zlokalizowanie telefonu komórkowego bez wykrycia go przez niego?