ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे व कीर्तन महोत्सवाचे आयोजन
गुरुवर्य ह. भ. प सुरेश महाराज सुळ, गुरुवर्य ह. भ. प. धनंजय महाराज कदम, गुरुवर्य ह. भ. प. मनोज महाराज यादव यांच्या आशीर्वादाने महोत्सवाचे आयोजन
मोरोची (बारामती झटका)
मोरोची ता. माळशिरस येथे ज्ञानवैभव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मोरोची, संचलित ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे व किर्तन महोत्सवाचे आयोजन गुरुवर्य ह. भ. प सुरेश महाराज सुळ, गुरुवर्य ह. भ. प. धनंजय महाराज कदम, गुरुवर्य ह. भ. प. मनोज महाराज यादव यांच्या आशीर्वादाने ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था, मोरोची येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात ह. भ. प. साधकह्लदय श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) यांचे शुभाशीर्वाद व उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य व निष्ठावंत वारकरी असणार आहेत.
शुक्रवार दि. २/६/२०२३ रोजी सायंकाळी ७ ते ९ विद्या, विनोद, वैभव ह. भ. प. प्रकाश महाराज साठे बीड यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच या दिवशी पिंपळी, ता. बारामती येथील विकास देवकाते आणि चौंडी, जि. अहमदनगर येथील सचिन ढोले यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
शनिवार दि. ०३/०६/२०२३ रोजी सायंकाळी ७ ते ९ कंठभूषण ह. भ. प संजय महाराज वेळुकर, सातारा यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी सुमित भाऊ जानकर युवा मंच, माळशिरस यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
तरी या कीर्तनसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The authors perspective is really interesting. Looking forward to more discussions. Check out my profile!
Ищите в гугле