भरणेवाडी येथे झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर बोराटे महाराज यांचे सुश्राव्य किर्तन होणार.
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या मातोश्री स्व. गिरीजा भरणे उर्फ जीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादचे आयोजन..
इंदापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या मातोश्री स्वर्गीय गिरीजा विठोबा भरणे उर्फ जीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भरणेवाडी, ता. इंदापूर येथे झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन मंगळवार दि. 20/06/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे.

तरी सर्व मित्र परिवार, नातेवाईक यांनी उपस्थित राहून कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रामचंद्र विठोबा भरणे, आबासो भगवान भरणे, मधुकर विठोबा भरणे, दत्तात्रय विठोबा भरणे व समस्त भरणे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng