महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचा पद नियुक्ती व सत्कार समारंभ संपन्न
जनप्रवासचे इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार यांची तालुका अध्यक्षपदी निवड
इंदापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचा पद नियुक्ती व सत्कार समारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे पार पडला.
यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून संघटनेची इंदापूर तालुका पत्रकार आघाडी कार्यकारणी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली –
प्रदेश उपाध्यक्ष संतोष दहिदुले, अध्यक्ष पत्रकार शिवाजी आप्पा पवार, उपाध्यक्ष बापू बोराटे, संजय शिंदे, कार्याध्यक्ष जावेद मुलाणी, सचिव सत्यजीत रणवरे, सहसचिव संतोष आटोळे, सरचिटणीस योगेश कणसे, खजिनदार गणेश कांबळे, सहखजिनदार दत्ता पारेकर तर प्रसिद्धीप्रमुख पदी अतुल सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून संघटनेच्या सदस्य पदी अमोल भोग, बापु राहिगुडे, दत्तात्रय गवळी, लक्ष्मण भिसे, महेश गडदे, संतोष भरणे, मुख्तार काझी, राहूल बोबडे, रामदास पवार, सलीम शेख, समीर सय्यद, संतोष जामदार, संतोष कदम, विशाल भोंग, शिवकुमार गुणवरे, भिमसेन उबाळे, अमोल कांबळे, बबनराव धायतोंडे, अरुण भोई आदि पत्रकारांची निवड करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण माने, माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शिवसेना (ठाकरे गट) इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर पंचायत समिती येथील सभागृहात झालेल्या पदनियुक्ती कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी बोलताना मोहिते पाटील यांनी पत्रकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत पत्रकार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असून पत्रकार हा आरशाप्रमाणे असतो. तो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवत असतो. सध्या समाजात पत्रकारांवरती होणारे हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना हि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी असून आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवत आहे. पुढील काळात देखील संघटना पत्रकारांच्या व समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असा विश्वास मोहिते पाटील यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू बोराटे यांनी केले तर प्रस्ताविक शिवाजी पवार यांनी केले. तसेच पत्रकारांच्या वतीने सत्यजित रणवरे व भीमसेन उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter