चि. अजय पालवे पाटील (जलसंधारण अधिकारी), मांडवे आणि चि. सौ. कां. डॉ. प्रतीक्षा लोखंडे (एम.डी.), पांढरेवस्ती, टाकळी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे पाटील
ग्रामपंचायत सदस्य, मांडवे
श्री. महादेव भगवान पालवे पाटील
अध्यक्ष, तंटामुक्ती समिती मांडवे
मांडवे (बारामती झटका)
कै. दादा बाबा पालवे पाटील यांचे नातू व श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे पाटील रा. मांडवे, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चि. अजय (जलसंधारण अधिकारी) आणि कै. रामचंद्र निवृत्ती लोखंडे यांची नात व श्री. दिलीप रामचंद्र लोखंडे रा. (वाकड, पुणे), मु. पो. पांढरे वस्ती, टाकळी, ता. पंढरपूर यांची कन्या चि. सौ. कां. डॉ. प्रतीक्षा (एम.डी.) यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. १६/११/२०२५ रोजी दुपारी २ वा. ११ मि. मधुर मिलन सांस्कृतिक भवन, मांडवे-नातेपुते नजीक, पंढरपूर रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. आगमन झाले शुभ योगाचे, नाते जुळले दोन मनाचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग सागर संसाराचा, आशीर्वाद असो मान्यवरांचा, प्रेमाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे यासाठी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे पाटील ग्रामपंचायत सदस्य, मांडवे, श्री. महादेव भगवान पालवे पाटील, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, मांडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पालवे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



