मेडद येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन

मेडद (बारामती झटका)
श्री स्वामी समर्थ ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मेडद यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा शुक्रवार दि. २०/०३/२०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी पहाटे ५.३० वा. अभिषेक व ८.३० वा. मेडद नगरीतून श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दु. १२ वा. ५ मि. ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दु. ४ ते सायं. ६ वा. पर्यंत गजीढोल कार्यक्रम असणार आहे.
कै. मनोहर अण्णा जगताप यांच्या स्मरणार्थ श्री. आधिकराव मनोहर जगताप यांच्या सौजन्याने ह. भ. प. गायनाचार्य दत्तात्रय गलांडे महाराज लासुर्णे, ता. इंदापूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रात्री ०८.३० ते १०.३० पर्यंत करण्यात आले आहे.

तरी या प्रकट दिन सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



