मोहोळ येथील यात्रेत गोडसे बंधूकडून यात्रेकरूंना पाणीवाटप

मोहोळ (बारामती झटका)
श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ श्री. अविनाश दत्तात्रय गोडसे प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व श्री. सतिश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरिक्षक काशीमीरा पोलीस स्टेशन मुंबई यांचेतर्फे दरवर्षीप्रमाणे यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. यात्रेकरूंना पाणी वाटप मोहोळ पंचायत समिती गट नेते श्री. संजीव (दादा) खिलारे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड, मुख्याध्यापक श्री. संतोष गायकवाड, नगरसेवक सुशिल (भैय्या) क्षीरसागर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी श्री. सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, जगदीश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, जान्हवी गोडसे, श्लोक गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, सुरेश राऊत, आयुब इनामदार, चंद्रकांत सुळ, सुरेश माळी, अफिज सादिक इनामदार, शकील इनामदार, रुतुराज गायकवाड, बाहुबली खांडेकर, दिगंबर व्हनमाने आदि उपस्थित होते. यात्रेकरूंनी गोडसे बंधूना पाणी वाटप केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



