लक्ष्मीबाई भगवान ताटे देशमुख यांचे वयाच्या ११६ व्या वर्षी दुःखद निधन

संगमचे विद्यमान सरपंच नारायणराव भगवान ताटे देशमुख यांना मातृषोक
वाघोली (बारामती झटका)
संगम गावातील ज्येष्ठ व्यक्ती लक्ष्मीबाई भगवान ताटे देशमुख मु. संगम यांचं दि. २६/४/२६ रोजी सकाळी ६.३५ वा. वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले. संगम गावचे विद्यमान सरपंच नारायणराव भगवान ताटे देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.
अत्यंत खडतर परिस्थितीत लवकरच त्यांच्या पतीचे निधन झाले. या खडतर परिस्थितीत त्यांनी ३ मुली व २ मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, ३ मुली, नातवंडे, परंतवंडे असा परिवार आहे.
सर्व परिसरात त्यांना आज्जी या नावाने संबोधले जात होते. त्यांच्या जाण्याने गेले शेकडो वर्षे जगत असताना त्यांचे अनुभव नेहमीच प्रेरणादायी ठरत असत. एक चालतंबोलतं पुस्तक कायम स्वरूपी आज बंद झाले.
लक्ष्मीबाई ताटे देशमुख यांच्या निधनाने ताटे देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर ताटे देशमुख परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व लक्ष्मीबाई ताटे देशमुख यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



