समाज कल्याणला मिळाले हायटेक सभापती कार्यालय; संस्कृतीताई सातपुते यांनी पदाची क्रेझ वाढवली

सोलापूर (बारामती झटका)
तब्बल चार वर्षानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन सदस्य आले. त्यामध्ये माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते या माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या.
संस्कृतीताई सातपुते यांना समाज कल्याण सभापती पदाचे बक्षीस मिळाले. त्या उच्चशिक्षित असल्याने त्यांनी अतिशय झोकून देत या विभागात काम सुरू केले आहे. समाज कल्याणच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी सभापती पदाची क्रेझ सुद्धा वाढवण्याचे पाहायला मिळते.
यंदा अध्यक्ष पदाची केबिन सोडली तर सर्वच इतर सभापतींनी आपल्या केबिनचे नूतनीकरण केले आहे. त्यामध्ये सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी स्वतःच्या संकल्पनेतून केबिन तयार करून घेतली. सध्या ही केबिन अतिशय हायटेक दिसत आहे. सभापतींना बसण्यासाठी एक प्रकारे डायस करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



