दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस नातेपुते पोलिसांनी शिताफीने ठोकल्या बेडया

नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे विशेष पथकाची धडक कामगिरी
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं. 373/2024 भा.न्या. संहिता २०२३ चे कलम 118(1),115(2),351(2) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी 1) दत्तू बाबा मदने वय 42 वर्ष, रा. भांब, ता. माळशिरस, जि. सोलापूर, हा नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरारी होता. त्याच्या ठाव ठिकाण्याबाबत काही एक माहिती प्राप्त होत नव्हती.
गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार यातील आरोपी भांब येथील त्याच्या राहत्या घरी त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी येणार आहे, अशी गोपनीय खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने माहितीची पडताळणी करून तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून सदर आरोपीला शिताफिने ताब्यात घेऊन सदर आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे. तसेच सदर आरोग्यविरुद्ध माननीय न्यायालयामध्ये लवकरच दोषारोप पत्र सादर केले जाणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर, पोसई सोनल मोरे, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक अमोल वाघमोडे, पोलीस अंमलदार / रणजीत मदने, पोलीस अंमलदार असलम शेख, राहुल वाघमोडे नातेपुते पोलीस ठाणे यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



