देऊळ बंद 2 चित्रपट लाडक्या बहिणींना भारतीय जनता पार्टीकडून मोफत दाखवण्यात येणार…

अकलूज (बारामती झटका)
देऊळ बंद 2 परीक्षा देवाची हा 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेला एक अतिशय यशस्वी आणि भावनिक चित्रपट आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. यात शेतकरी आत्महत्या आणि श्रद्धा अंधश्रद्धा यांच्यातील संघर्षाचा संवेदनशील विषय मांडण्यात आलेला आहे. असा समाज उपयोगी देऊळ बंद 2 चित्रपट श्रीराम थिएटर येथे सुरू आहे. सदरचा चित्रपट अकलूज परिसरातील लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्यात येणार आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे, भाजपचे तालुका संघटक डॉ. निलेश ननवरे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांच्या वतीने कायम समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शालेय साहित्य, शेतकऱ्यांना कडबा वाटप, गोरगरिबांना पत्रे वाटप, सर्वसामान्य महिलांना शिलाई मशीन वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून सर्व जाती धर्मातील महिलांना विमानाने व रेल्वेने बालाजी दर्शन केले जाते.

महिलांनाही एक अतिशय यशस्वी व भावनिक चित्रपट पाहता यावा, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपचे जेष्ठ नेते प्रकाशबापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींना मोफत देऊळ बंद 2 चित्रपट अधिक पुरुषोत्तम मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार दि. 15 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता लाडक्या बहिणींना मोफत चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 251 लाडक्या बहिणीचे नियोजन केलेले होते मात्र, 315 लाडक्या बहिणींनी नोंदणी केलेली आहे. श्रीराम थिएटरची 318 आसन व्यवस्था आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पायरीवर बसून देऊळ बंद २ पिक्चर पहावा लागणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



