ताज्या बातम्याराजकारण

समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी तालुक्यातील विकास कामांना केला 10 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर…

पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण सभापती सौ‌ संस्कृतीताई सातपुते यांचा विकासकामांचा धूमधडाका….

पतीच्या विकासकामांच्या वाटेवरून पत्नीची दमदार वाटचालीची सुरुवात…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांचा माळशिरस विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धुमधडाका सुरू असून तालुक्यातील विकासकामांना दहा कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याला विकास काय असतो, हे दाखवून यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करत होते. त्याच धर्तीवर समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केलेला असल्याने पतीच्या विकासकामांच्या वाटेवरून पत्नीची दमदार वाटचाल सुरू असल्याची सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे..

१) रेडे मेटकरवस्ती ग्रामा 163 सा क्र 0/000 ते 1/000 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 25.00 लाख रु.

२) पवारवस्ती गुरसाळे ते मुंजवडी ग्रामा 277 साक्र 0/00 ते 2/00 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 50.00 लाख रू.

३) कांरुडे रानगटवस्ती ग्रामा 270 सा क्र 0/000 ते 1/000 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 25.00 लाख रु.

४) कचरेवाडी ते इजिमा 102 ग्रामा 499 सा क्र 0/000 ते 1/000 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 38.00 लाख रु.

५) डोंबाळवाडी (जोडरस्ता) ते प्र.18 ग्रामा 129 साक्र 0/000 ते 1/00 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 25.00 लाख रु.,

६) एकशिव तांबेवाडी ते करालवस्ती रस्ता ग्रामा 669 सा क्र 0/000 ते 1/500 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 50.00 लाख रू.

७) पिलीव वाघमारे वस्ती ग्रा. मा. 352 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 3.00 लाख रु.

८) जरगवस्ती ते रामा 140 ग्रा.मा. 473 रस्ता दुरुस्ती करणे – 3.00 लाख रु.

९) गट नं. 2 वंजरादेवी महालक्ष्मी ते हिंगणी ग्रा.मा. 585 रस्ता दुरुस्ती करणे – 3.00 लाख रु.

१०) तांदुळवाडी ते निलटेवस्ती ग्रा.मा. 65 रस्ता दुरुस्ती करणे – 3.00 लाख रु.

११) लोंढे मोहीतेवाडी गिरवी मायनर प्र. 101 ग्रामा 260 सा क्र 0/000 ते 1/000 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 25.00 लाख रू.

१२) एकशिव ते विरपुरी ग्रामा 78 सा क्र 0/000 ते 3/000 मध्ये रस्ता दुरुस्ती करणे – 30.00 लाख रु.

१) मोरोची ते सांळुकेवस्ती भिसे वस्ती रस्ता साक्र 0/00 ते 2/00. ग्रामा 467 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

२) किर्दकवस्ती ते रामा 124 दहिगांव रस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 221 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

३) धर्मपुरी कर्चेवाडी प्ररामा 15 जोडणारा रस्ता साक्र 0/000 ते 2/500 ग्रामा 156 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

४) मोरोची सोनपेट रस्ता साक्र 0/00 ते 3/00 ग्रामा 140 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

५) प्र.116 इस्लामपुर ते भंडोबा देवस्थान पवारवस्ती रस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 301 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

६) दहिगांव पी. के. सावंतवस्ती रस्ता साक्र 0/00 ते 2/00 ग्रामा 291 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

७) अलंकापुरी ते प्र.176 रस्ता साक्र 0/00 ते 1/500 ग्रामा 624 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

८) देखमुखवाडी आसु (जिल्हा हद्द) रस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 228 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

९) कुरबावी हनुमानवाडी इमानवस्ती रस्ता साक्र 0/00 ते 1/500 ग्रामा 620 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

१०) शिंदेवाडी ते हनुमानगांव ते देखमुखवस्ती जोडरस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 665 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

११) बाभुळगांव ते इंगळेवस्ती रस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 474 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

१२) नातेपुते दहिगांव 43 फाटा रस्ता साक्र 0/00 ते 1/00 ग्रामा 257 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

१३) महालक्ष्मी देवस्थान ते रामा 140 रस्ता साक्र /0/000 ते 1/500 ग्रामा 103 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.

१४) फडतरी मठवस्ती चिदादेवी रस्ता साक्र /0/00 ते 1/00 ग्रामा 249 रस्ता काम करणे – 50.00 लाख रू.
अशी 26 कामे मंजूर केलेली आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत दहिगाव जिल्हा परिषद गटातील सुज्ञ व स्वाभिमानी मतदारांनी आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवनकुमार जानकर यांचा जिल्हा परिषद गटात व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पंचायत समिती गणात दारुण पराभव केलेला होता. दहिगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते, श्री. दत्तात्रेय शेळके, कु. तनुजा खिलारे, यांना भरघोस मतांनी निवडून देऊन विकासप्रिय नेतृत्व राम सातपुते यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलेले होते. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून संस्कृतीताई सातपुते यांनी मतदारसंघासह तालुक्यातील विकासकामांना कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे.

माळशिरस तालुक्याचा पश्चिम भागाला जाणीवपूर्वक प्रस्थापितांनी विकासकामांपासून वंचित ठेवलेले होते. खऱ्या अर्थाने विकासकामांचा बॅकलॉग तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विकासकामे करून पश्चिम भागाला न्याय देण्याची भूमिका ठेवलेली होती. त्यामुळेच मोहिते पाटील व जानकर या दोन शक्तींचा एकाच वेळी पराभव करून सातपुते यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली होती. दिलेल्या संधीचे सोने करून संस्कृतीताई यांनी स्वाभिमानी व सुज्ञ मतदारांच्या विकासकामांची अपेक्षा पूर्ण करीत आहेत.

विधान परिषदेवर रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार म्हणून सहा वर्ष कार्यरत होते. त्यांनी कधीही तालुक्यातील विकासकामांना एवढा कोटी रुपये निधी मंजूर केलेला नाही. तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विकासकामांना निधी मंजूर केल्यानंतर पत्रव्यवहार करून स्वतः निधी मंजूर केला, अशी स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत होते. अशी माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असायची. आत्तासुद्धा संस्कृतीताई सातपुते यांनी मंजूर केलेल्या विकासकामांवर आम्हीच मंजूर केला असा कांगावा केला असता. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व वाटा बंद झालेल्या असल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कोटीची कामे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेली फक्त ऐकावयाची आहेत. अशी राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button