ताज्या बातम्यासामाजिक

धक्कादायक बातमी :- सब पोस्ट मास्तर बदलीसाठी चक्क ग्रामसभेत ठराव…

सब पोस्ट मास्तर वेळापूर यांच्या बदलीसाठी गावातील नागरिकांचा ग्रामसभेत ठराव मंजूर….

वेळापुर (बारामती झटका)

वेळापूर, ता. माळशिरस ग्रामपंचायत सरपंच श्री. रजनीश दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ, सदस्य, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऐनवेळी आलेला विषय सब पोस्ट मास्तर वेळापूर यांची बदली होणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदरच्या ठरावाचे सूचक श्री. रामचंद्र पंढरीनाथ वाघमोडे तर अनुमोदक श्री. औदुंबर उत्तम शेडगे यांनी दिलेले आहे…

सदरच्या ठरावांमध्ये, मौजे वेळापूर येथील पोस्ट कार्यालयात सौ. जयश्री सुनील मिसाळ या सब पोस्ट मास्तर या पदावर काम करीत असून त्यांचे सहकार्यांशी, नागरिकांशी, शालेय विद्यार्थ्यांशी व ज्येष्ठ नागरिकांशी वर्तन व्यवस्थित नसून उद्धट व उर्मट भाषा असल्याने त्यांची वेळापूर येथून अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी. अन्यथा त्यांचे वर्तनामुळे पोस्टाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन पोस्टाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होणार असल्याने त्यांची तातडीने बदली होण्याबाबत या सभेत चर्चा करण्यात येऊन त्यास या सभेची मान्यता असे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करून वरील प्रमाणे ठरावाची नक्कल पंढरपूर पोस्ट ऑफिस व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेली आहे.

ग्रामसभेच्या ठरावाची प्रत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वेळापूर गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button