मळोली गावातील जयश्री दीपक घाडगे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

पत्रकार महेश घाडगे यांना मातृशोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस गावातील जयश्री दीपक घाडगे यांचे शनिवार दि. 10/10/2026 रोजी सकाळी 6.25 वाजता वयाच्या 55 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, नणंद, चार दिर, चार जावा, पाच पुतणे, नऊ पुतण्या असा मोठा परिवार आहे. पत्रकार महेश घाडगे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आजच सकाळी 12.30 वाजता मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या दुःखद निधनाने घाडगे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घाडगे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



