ताज्या बातम्यासामाजिक

वेळापूर परिसरातील गुटखा माफियांना वरिष्ठांचे अभय का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला.

मावा व गुटखा माफीयांचे मंथली पाकीट पोहोच होत असल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्त जनता त्रस्त, माफिया मस्त…

वेळापूर (बारामती झटका)

अन्न व भेसळ आयुक्त पदाचा पदभार महाराष्ट्रातील सर्वपरिचित असणारे श्री. तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक भेसळ करणारे व गुटखा, मावा विक्री करणारे यांच्यावर कडक कार्यवाही करून अशा बेकायदेशीर गोष्टींना आळा बसलेला होता. मात्र, भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा मावा व गुटखा माफियांनी डोके वर काढलेले आहे.

अर्धनारी नटेश्वर नगरी वेळापूर परिसरात मावा व गुटखा माफियांची खुलेआम जोरदार राजरोसपणे विक्री सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे व सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी लक्ष देऊन माफीयांच्या मुस्क्या आवळाव्या अशी नागरिक व पालकांमधून चर्चा सुरू आहे. अशी बातमी प्रकाशित केलेली होती. तरीसुद्धा वेळापूर परिसरातील गुटखा माफियांना वरिष्ठांचे अभय का, असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला असून मावा व गुटखा माफीयांचे मंथली पाकीट पोहोच होत असल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्त, जनता त्रस्त, माफिया मस्त अशी दयनीय अवस्था FDA अन्न व औषध अधिकारी व पोलीस प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे..

सदरच्या बातमीमध्ये वेळापूर शहर लोकसंख्येने मोठे आहे. आसपासच्या गावातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव, प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे महिला लहान मुले अशा अनेक गोष्टींमुळे हजारो लोकांचा दैनंदिन वेळापूर गावाशी संबंध येत असतो. जिल्हा परिषद शाळा, कॉलेज परिसर, मुख्य चौक अशा ठिकाणी पान टपऱ्या, हॉटेल, जनरल स्टोअर्स अशा ठिकाणी राजरोस खुलेआम मावा व गुटखा मिळत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी सुद्धा सहज उपलब्ध होत असल्याने व्यसनाकडे वळत आहेत.

वेळापूर शहर माळशिरस तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात आहे. कर्नाटक मधून येणारा गुटखा पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागातून येत असतो. पहिल्याच मोठे स्टेशन असल्याने आयसीआर कॅन्टर, पिकअप दररोज वेळापूर पंचक्रोशीत माफीयांच्या माध्यमातून वितरित केले जाते. किरकोळ विक्रेते ग्राहकांना खुलेआम देत आहेत‌. पूर्वी चोरून विकला जाणारा मावा व गुटखा आता खुलेआम झालेला आहे. कशामुळे खुलेआम झालेला आहे, याच्या मुळाशी जाण्याकरता आयुक्त तुकाराम मुंडे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संयुक्त मोहीम राबवून स्पेशल पथक तयार करून माफीयांसह किरकोळ विक्रेते यांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी सुज्ञ नागरिक व पालकांच्या मधून चर्चा सुरू असताना सुद्धा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे इन्स्पेक्शन करून सुद्धा गुटखा माफीयांची परिस्थिती जैसे थे आहे. उलट शनिवारी बाजारात व शारदीय नवरात्र उत्सवातील नवरात्र उत्सवाच्या ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या हौशी मंडळाकडे पिशव्या व खिसे भरून गुटखा उपलब्ध झाला आहे. याची सविस्तर बातमी पुढील वृत्तात…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button