रत्नत्रय पतसंस्थेचा सचिव ज्ञानदेव राऊत यांच्यावर दुर्गा देवीचा कोप, संपूर्ण नवरात्र उत्सव कस्टडीत घालवली…

चेअरमन व संचालक मंडळ यांचा ऐन दिवाळीत शिमगा होणार….
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव राऊत यांना सात दिवसांची पोलीस कस्टडी PC संपून मॅजेस्टिक कस्टडी MC मिळालेली आहे. तरीसुद्धा जामीन मिळालेला नाही. रत्नत्रय पतसंस्थेचा सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांच्यावर दुर्गा देवीचाच कोप झालेला असावा. संपूर्ण नवरात्र उत्सव कस्टडीत घालवले आहे..
रत्नत्रय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे.
सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465, 468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला होता.

सात दिवसाची पोलिस कस्टडी संपून मॅजेस्टिक कस्टडी मिळालेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल नवले पुढील तपास करीत आहेत.
रत्नत्रय पतसंस्थेचा सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना मिळालेली पोलीस कस्टडी व मॅजेस्टिक कस्टडी यावरून सहकार क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. सदरच्या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करीत असताना अनियमित्ता झालेली असणार आहे. लिमिटपेक्षा ज्यादा कर्ज वाटप कर्जदारांना केलेले असावे असाही निष्कर्ष निघत आहे. काही सहकार तज्ज्ञांच्या मते सदरच्या पतसंस्थेवर प्रशासक सुद्धा येऊ शकते किंवा कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असेल तर एसआयटी सुद्धा लागू शकते असे जर झाले तर रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांचा ऐन दिवाळीत शिमगा होईल, अशी ही सहकार क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे.
सोमवार किंवा मंगळवारी सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना जामीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्ञानेश राऊत यांनी सावकारकीमध्ये घेतलेली जमीन कशा पद्धतीने विल्हेवाट लावली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दुर्गादेवी का कोपली, कशा पद्धतीने वसुली सुरू होती, कोणते एजंट कर्जदारावर धमक्या देऊन दबाव आणत होते लवकरच सविस्तर वृत्त….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



