आपला युवक शेतकरी फोरमचे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

माळशिरस (बारामती झटका)
युवक व शेतकरी मित्रांनो, आपला युवक शेतकरी फोरम महाराष्ट्र राज्य या संघटने मार्फत आपण विविध सरकारी योजनांची वारंवार माहिती देत असतो. युवकांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, हाच आपला ध्यास आहे.
परवा शासनाने शेतकरी व युवक यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांना सौरऊर्जा, विमा योजना इत्यादी योजना आहेत. तसेच युवकांसाठी, प्रशिक्षण केंद्र शिवाय १० लाख युवकांना प्रति १० हजार मदत अशा योजना जाहीर झाल्या आहेत. त्या योजनांचा युवकांनी व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.

ऑनलाइन आपलं सरकार किंवा महा-ई सेवा या ॲपचा वापर करुन रितसर प्रत्येकाने मागणी करावी. त्यात काय अडचणी आल्या किंवा मागणी करण्याची माहिती नसल्यास उमेश जगताप (९८९०४०६३१६), सागर कोळेकर (९१३०२६०१८५), अभिजित पिसे (९९२२९४८८११) यांच्याशी या नंबरवर संपर्क करावा हि विनंती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.