कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेस ८८४ कोटी रुपये मंजूर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.

सांगोला (बारामती झटका)

सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची असणारी बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सांगोल्याचे आमदार शहाजीबापु पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मंजुरी देऊन ८८४ कोटी रुपये मंजुर केले.

सांगोला तालुका हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे या भागातल्या दुष्काळी जनतेला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की, पुढची निवडणुक ही पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही. त्यामुळे सातत्याने खासदार व आमदार शहाजीबापू पाटील हे प्रयत्न करत होते. आजचा दिवस सांगोला तालुक्याच्या दृष्टीने सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा निर्माण झाला आहे. या योजनेमुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सांगोला तालुक्याला निरा देवधर, टेंभू योजना, आता बाळासाहेब ठाकरे सांगोल उपसा सिंचन या योजनेतून पाणी मिळणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमस्वरूपी आता पुसला जाणार आहे व या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना युवकांना आता नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई आणि पुण्याला हेलपाटे घालावे लागणार नाहीत.

आज तालुक्यामध्ये जनतेने फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापु पाटील तसेच केंद्र शासनाचे ही आभार मानले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

30 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort