नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या परिवाराची खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते नगरीचे बुजुर्ग व्यक्तिमत्व माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांचे दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या परिवाराची माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.


यावेळी समाजभूषण राजेंद्रभाऊ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी धुळदेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्रभाऊ यांचे बंधू संजयतात्या पाटील, नातेपुते नगरीचे नगरसेवक अतुलबापू राजेंद्रभाऊ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली संजय पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील यांच्यासह नातेपुते पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.