दिव्यांगाच्या अध्यक्षांना मिळाला नाही न्याय, पुणे खंडपीठात अपील करताच या अधिकाऱ्यांवर झाली कारवाई..

पुणे (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांनी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांच्या माहिती अधिकाराचे उत्तर दिलेले नाही. दिव्यांग 5% निधी व दिव्यांग घरकुलविषयी माहिती मागितली असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी व माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्यावर माहिती अधिकार टाकून माहिती अधिकाराचे यांनी उत्तर दिलेली नसल्यामुळे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांनी पुणे खंडपीठाला अपील केले होते.
पहिल्या अपीलमध्ये सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी गैरहजर राहिले, तसेच अपीलकरते विजय काका कुलकर्णी यावेळी हजर राहीले होते यावेळेस पुणे खंडपीठात विजय काका कुलकर्णी यांनी खंडपीठाला दाखवून दिले की, दिव्यांग बांधवांना हेडसांळपणाची वागणूक मिळत आहे. माहिती सुद्धा दिली जात नाही. असे पुणे खंडपीठाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पुणे खंडपीठाच्या अधिकाऱ्यांनी चालू असणाऱ्या अपिलावर विजय काका कुलकर्णी यांच्या बाजूने निकाल दिला व सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी दि. 9/12/2015 नुसार त्यात तरतुदीच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई व दप्तर दिरंगाईची कारवाई करावी असा पुणे खंडपीठाने निकाल दिला आहे. तसेच पोलीस कारवाईला सुद्धा पात्र आहे.


असा निकाल पुणे खंडपीठाचा आल्यामुळे दिव्यांग भव्य क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी हे सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माळशिरस तालुका गट विकास अधिकारी यांच्या विरोधात माहिती अधिकाराची माहिती न दिल्यामुळे पोलीस कारवाई करणार आहेत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना विजय काका कुलकर्णी म्हणाले, आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती येथे असून येथे माहिती अधिकार देऊन सुद्धा आम्हाला माहिती दिली जात नाही. तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी ग्रामसभा घेतली जाते परंतु, त्या ग्रामसभेमध्ये आम्हा दिव्यांग बांधवाला बोलण्याची संधी दिली जात नाही. तसेच या ग्रामसभेसाठी आमंत्रित सुद्धा केले जात नाही. अशीही दिव्यांग बांधवांवर होत असणारी हेडसांळपणाची अपमानास्पद वागणूक, अन्याय, अत्याचार थांबला पाहिजे, असे यावेळी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.