आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

अकलूज येथे जागतिक नर्स दिन उत्साहात संपन्न

अकलूज (बारामती झटका)

आज दि. 12/05/2025 रोजी जागतीक नर्सेस दिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय अकलूज येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुडे सर यांच्या नेतृत्वाने आणि डॉ. श्रद्धा जवंजाळ मॅडम यांचे सहभागातून, जागतीक नर्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. श्रद्धा जवंजाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तर IMA अकलूजचे अध्यक्ष डॉ. संजय सिद आणि देवडीकर हॉस्पिटल च्या संस्थापिका वसुंधरा देवडीकर, थोरात सर हे अतिथी म्हणून उपस्थित होते. या शिवाय उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही उपस्थित होते.

यावेळी डॉ. स्मिता शिंदे मॅडम यांनी एक कविता करून नर्सेस चे कौतुक केले तर सर्वांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. श्रद्धा जवंजाळ मॅडम यांनी सहारा नर्सिंग कॉलेजच्या वतीने, अकलूज येथील कामकाजाचे गुणगौरव करत त्यांनी, सर्व अकलूज नर्सेस टीमचे ट्रॉफी देऊन कौतुक केले. तसेच फ्लॉरेन्स नाईटेन्गील यांच्या फोटोचे प्रतिमा पूजन करून शपथ विधी घेण्यात आला. तसेच नर्सेसनी केक कापून हा दिवस साजरा केला.

यावेळी आवर्जून उपस्थित असलेल्या सेवानिवृत्त केदारी सिस्टर आणि भांबुरे सिस्टर यांचा ही सत्कार रोपटे देऊन करण्यात आले. तर सर्व नर्सेस आणि सहारा नर्सिंगचे स्टूडंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. डॉ. स्मिता शिंदे, डॉ. लवटे, डॉ. नेरे सर्व नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ व इतर कर्मचारी हजर होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button