जनतेचे हित जोपासून व कार्यकर्त्यांच्या भावना जपणारे लोकप्रतिनिधी आपला माणूस कामाचा माणूस…

वेळापूर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते जनतेचे हित जोपासून कार्यकर्त्यांच्या भावना जपणारे लोकप्रतिनिधी आपला माणूस कामाचा माणूस अशी ओळख असणारे राम सातपुते कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे निमंत्रण समजून कार्यकर्त्यांच्या भावना जपत आहेत.

वेळापूर, ता. माळशिरस येथील अर्धनारी नटेश्वर मंदिराशेजारील श्री गणपती मंदिराच्या शेजारी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी वेळापूर भाजप शहर युवक नेते पै. पिनूभाऊ येडगे, नारायण भाऊ मंडले, बिंटू मंडले, अतुल जाधव, भैय्या चव्हाण, पिनू लोंखडे, सोमा जाधव, दादा मंडले, समाधान मंडले, दिलीप जाधव आदी कार्यकर्त्यांसह भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओंकार खराडे, भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, निमगाव गावचे युवा नेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील, राम सातपुते यांचे कट्टर समर्थक कुंडलिकराजे मगर, तोंडले गावचे सुहास निकम, धानोरे गावचे आखेश देवकाते, धानोरे गावचे अर्जुनभाऊ देवकाते, श्रीधर देशपांडे, स्वनिल माने देशमुख, पिसेवाडी गावचे भैय्या धोत्रे, वैजनाथ शेंडे, वेळापूर गावचे दत्ता येडगे, अनंत मंडले, हर्षवर्धन बनसोडे, नितीन भाकरे, काका मंडले, आकाश काटे, नारायण सर्वगोड, सोनू मंडले, बापू साठे, अशय जाधव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.


वास्तविक पाहता, पाणपोईचे उद्घाटन साधा विषय आहे. मात्र, उन्हाळ्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ओळखून जनतेचे हित कार्यकर्ते जोपासत असल्याने लोकप्रतिनिधी यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून पाणपोईच्या उद्घाटनाला उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत याची प्रचिती दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.