राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत “गरुड झेप”
शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाच्या सत्तेचा बुरुज ढासळून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चंचू प्रवेश..
वेळापूर (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाच्या सत्तेचा बुरुज ढासळून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तमराव जानकर यांच्या रूपाने माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचा चंचू प्रवेश झालेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य उत्तमराव जानकर यांची अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत “गरुडझेप” झालेली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर व भाजपचे के. के. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर, शिवसेनेचे नामदेव वाघमारे यांनी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी स्थापन करून शिवरत्नवरील सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात पॅनल उभा करून निवडणुकीस सामोरे गेलेले होते.
मोहिते पाटील यांच्या पारंपारिक विरोधामधील दुसरा गट भाजपचे राजकुमार पाटील, काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. रामदास देशमुख, शंकरनाना देशमुख, माणिकबापू वाघमोडे व इतर नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये मनोमिलन झालेले होते. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातून पद्मजादेवी मोहिते पाटील, के. के. पाटील, उत्तमराव जानकर व यशवंतराव उर्फ दादासाहेब घाडगे यांचा विजय होईल. अशी तालुक्यात व मतदारांच्या मधून चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा 30 मतांनी विजय झालेला होता. सत्ताधारी मोहिते पाटील गटाचे 17 उमेदवार निवडून आलेले होते. तरीसुद्धा, सत्ताधारी गटाने उत्तमराव जानकर यांच्या फेरमोजणीची मागणी केली. त्यामध्ये सुद्धा उत्तमराव जानकर यांना चार मते ज्यादा मिळून उत्तमराव जानकर 34 मताने विजय मिळवून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर गरुड झेप घेतलेली आहे.
उत्तमराव जानकर यांनी आपल्या भाषणांमधून दरवाज्यातून राहिला मात्र, खिडकीतून तरी प्रवेश करू असे सांगितलेले होते. त्याप्रमाणे खिडकीतून प्रवेश राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी केलेला आहे. भविष्यात त्यांच्यासोबत दरवाज्यातून अनेक सहकारी घेऊन जातील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Como recuperar mensagens de texto excluídas do celular? Não há lixeira para mensagens de texto, então como restaurar mensagens de texto após excluí – Las? https://www.mycellspy.com/br/tutorials/how-to-retrieve-deleted-text-messages-from-partner-phone/
I enjoyed reading this article. Its thought-provoking and well-presented. Lets discuss this further. Click on my nickname!