ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माळशिरसकर पालकमंत्री ना. जयाभाऊ गोरे यांचा क्रेनने हार घालून जीसीबीने पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉल्बीने स्वागत करणार….

भाजपचे निमंत्रित प्रांतिक सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्याकरिता गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी माळशिरस तालुक्यातून प्रयाण होत असल्याने माळशिरस तालुक्यात नातेपुते, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन माळशिरस शहरात आगमन होणार आहे. पहिल्यांदाच पालकमंत्री ना. जयकुमार गोरे येत असल्याने भाजपचे निमंत्रित प्रांतिक सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी केलेली आहे. माळशिरसकर यांनी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा सत्कार क्रेनने हार घालून जेसीबीने पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉल्बीने स्वागत करणार आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या समवेत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते हे असून या त्रिमूर्तींच्या सन्मानाचे नियोजन जंगी केलेले आहे. क्रेनच्या सहाय्याने हार घातला जाणार आहे. दोन्ही बाजूला जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी करून डॉल्बीने स्वागत करण्यात येणार आहे.

पालकमंत्री पाणीदार खासदार व दमदार आमदार यांना गोदरेजचा पेढा भरवून तोंड गोड केले जाणार आहे. कोल्हापुरी फेटा, पुण्याचा मोठा हार, सुप्रसिद्ध सोलापुरी चादरीवर जयाभाऊ यांचे तैलचित्र तयार केलेली मखमली शाल अंगावर टाकून हातामध्ये गुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

माळशिरस नगरपंचायतीचे प्रथम नागरिक व भाजपचे नगराध्यक्ष विजयराव देशमुख व त्यांचे नगरसेवक सहकारी यांच्याही वतीने त्रिमूर्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तत्कालीन पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे. यासाठी पालकमंत्र्यांसमवेत पाणीदार खासदार व दमदार आमदार यांचाही यथोचित सन्मान करण्याचे माळशिरसकरांनी माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जंगी तयारी केलेली आहे.

माळशिरसकरांचा सन्मान घेऊन वेळापूर येथील वेळापूरकरांचा सन्मान घेऊन पंढरपूर तालुक्यांमध्ये प्रयाण होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button