Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रतापगडावर रणनीती ठरली.

निवडणुकीचे मार्गदर्शक, भीष्म पितामह व अकलूज घोडेबाजाराचे जनक फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न…

माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीची पुनरावृत्ती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होणारच.


अकलूज ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे जिल्हा सह प्रभारी केके पाटील यांनी तालुक्यातील शिवरत्न वरील सर्व पारंपारिक विरोधी गटाची मोळी बांधून पहिली बैठक प्रतापगड येथे संपन्न झाली त्यामध्ये अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरलेली आहे निवडणुकीचे मार्गदर्शक भीष्म पितामह व अकलूज घोडेबाजाराचे जनक फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झालेली आहे. सर्व विषयावर सविस्तर चर्चा व रणनीती ठरलेली असल्याने माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीची पुनरावृत्ती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होणारच असा कार्यकर्त्यांना विश्वास आलेला आहे.


महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती पदी उत्तमराव जानकर यांची निवड झाल्यानंतर प्रतापगड येथे सदस्यांसह सन्मान केलेला होता त्याच पद्धतीने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पद्मजादेवी मोहिते पाटील, उत्तमराव जानकर , के के पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार यांनी निवडणुकीत मोठे आव्हान उभे केलेले आहे त्यामुळे निश्चितपणे प्रतापगडावर विजयी उमेदवारांचा युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान होऊन माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीची पुनरावृत्ती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होणार असल्याचे ठरलेल्या रणनीतीवरून कार्यकर्त्यांना विश्वास आलेला आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे खरेचित्र उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर ठरणार आहे तोपर्यंत सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधकांची एकजूट होऊन रणनीती ठरत आहेत अनेक नेते व कार्यकर्ते परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort